Thursday, May 2, 2024
spot_img
35.1 C
Delhi
Thursday, May 2, 2024
HomeBlogशिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख अॕड. निलेश राऊत यांचा ठाणे येथे कार्यक्रमात विषेश...

शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख अॕड. निलेश राऊत यांचा ठाणे येथे कार्यक्रमात विषेश सन्मान

शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख अॕड. निलेश राऊत यांचा ठाणे येथे कार्यक्रमात विषेश सन्मान
१० एप्रिल
पालघर ( एच. लोखंडे ) सागरी नागरी आणि डोंगरी भागात विभागलेल्या पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांना मिळत असलेली आरोग्य विषयक मदत. हि नव्याने तयार करण्यात आलेली पालघर जिल्हा आणि तालुका- कार्यकारिणी हा कौतुकाचा विषय आहे. नागरिक यांचे आरोग्य विषयक कामे अगदी कमी वेळेत करून, कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य यांनी आपल्या कामाने पालघर जिल्ह्याचे नाव पुढे आणले. या त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल दखल घेऊन, दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी. श्री. अॕड. निलेश रमेश राऊत – पालघर जिल्हाचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रतिनिधित्व करणारे. यांचा ठाणे येथे आयोजित रुग्णसेवकांशी संवाद या कार्यक्रमात मान्यवर यांच्या हस्ते विषेश सन्मान करून गौरवण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि प्रवक्त्या प्रा. ज्योतीताई वाघमारे, मा.मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख श्री.मंगेश चिवटे साहेब, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख श्री.रामहरी राऊत सर, यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले.हयावेळी राज्यातील वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व रुग्णसेवक, पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular