Thursday, May 2, 2024
spot_img
21.1 C
Delhi
Thursday, May 2, 2024
HomeBlogखानकर्मी - पालघर भरारी पथकाची, विरार विभागात कारवाई, ४ बोटी जाळून केल्या...

खानकर्मी – पालघर भरारी पथकाची, विरार विभागात कारवाई, ४ बोटी जाळून केल्या नष्ट

खानकर्मी – पालघर भरारी पथकाची, विरार विभागात कारवाई, ४ बोटी जाळून केल्या नष्ट
९ एप्रिल
पालघर ( एच लोखंडे ) वसई – विरारच्या किनारपट्टीवर पुन्हा वाळू माफिया सक्रिय झाले आहेत. या मिळत असलेल्या माहितीच्या अनुषंगाने मा. श्री. गोविंद बोडके – पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी व श्री. भाऊसाहेब फटांगडे – अप्पर जिल्हाधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या आदेशानुसार आणि गोपनीय माहितीनुसार. दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी मौजे. विरार ता. वसई जि. पालघर येथील, विरार जवळील खाडीकिनारी, मौजे काशीद कोपर येथे, स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी अनधिकृत पणे खाड्यामध्ये छुप्या मार्गाने सक्शन पंप लावून वाळू उपसा आणि वाहतूक होत असते. या भागत वाळू माफिया पुन्हा सक्रिय झालेले आहे आहेत. या कारणास्तव पालघर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वसई महसूल मंडळ अधिकारी, तलाठी पोलीस यांच्या संयुक्त पथकमे काशिदकोपर किनाऱ्यावर छापा घातला. असतांना कारवाईची कुणकुण लागताच काही वाळू माफिया फरार झाले. तरीही संयुक्त पथकाने अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या ४ बोटी जप्त केल्या. या ४ बोटी आणि वाळू उत्खनन करण्यासाठी वापरला जाणारा सक्शन पंप जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून / जाळून नष्ट करण्यात आल्या आहेत.
भरारी पथकात श्री. संदीप पाटील – पालघर जिल्हा खनिकर्म अधिकारी, श्री मारोती सुर्यवंशी – अधिकार शुल्क निरीक्षक- पालघर, श्री. हरिष सोनवणे – अव्वल कारकुन, श्री. सुशांत ठाकरे – मंडळ अधिकारी ता. वसई, श्री. विजयकुमार मींड – तलाठी तलाठीसजा – शिरसाड ता. वसई, श्री. विलास पाटील – तलाठी, तलाठीसजा- भाताणे ता. वसई, श्री. अनिकेत काळेल – तलाठी, तलाठीसजा – माजिवली ता. वसई. तसेच पोलीस कर्मचारी श्री. राम डावखुरे, श्री. दत्ता शिंदे आदींच्या पथकाने संयुक्त रितीने ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular