Thursday, May 2, 2024
spot_img
29 C
Delhi
Thursday, May 2, 2024
HomeBlogसुमन सुर्यकांत रोकडे - ओमकार महिला ग्राहक संस्था सफाळे, संस्थापकीय सदस्य. यांचे...

सुमन सुर्यकांत रोकडे – ओमकार महिला ग्राहक संस्था सफाळे, संस्थापकीय सदस्य. यांचे दु:खत निधन

सुमन सुर्यकांत रोकडे – ओमकार महिला ग्राहक संस्था सफाळे, संस्थापकीय सदस्य. यांचे दु:खत निधन
१७ एप्रिल
सफाळे ( एच. लोखंडे ) दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी आठ वाजता श्रीमती सुमन सूर्यकांत रोकडे रा.कुर्लाई देवी मंदिर रोड सफाळे पुर्व ता. जि. पालघर. यांचे वयाच्या ७५ या वर्षी दुःखद निधन झाले.
सफाळ्यातील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक कै. सूर्यकांत भगवान रोकडे यांच्या त्या पत्नी होत्या. सुमन रोकडे यांनी संघाच्या कामांमध्ये कै. सूर्यकांत रोकडे उर्फ भाई यांना साथ देऊन तीन पिढ्यांची संघ सरिता सांभाळली. भाई रोकडे संघ समर्पित जीवन जगले. भाईंनी गोवा मुक्ती आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. तसेच भाई कार सेवक ही होते, भाईंच्या मातोश्री व स्वतःभाई आणीबाणीतील काळातील सत्याग्रही होते. तृतीय वर्ष शिक्षित भाई रोकडे अनेक शिबिरांमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. शिस्तबद्ध व स्वाभिमानी जीवन रोकडे कुटुंब जगले. श्रीम. सुमन रोकडे ह्या सामाजिक, आणि संघ परिवार कार्यक्रमात, खंबीर रित्या भाईंच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्या सर्वांच्या लाडक्या होत्या. ओमकार महिला ग्राहक संस्थेच्या गेल्या पंचवीस वर्षे संस्थापकीय सदस्या म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांच्या निधनाने सफाळकर वासियांना हळहळ होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.
सफाळेकर आणि संघपरिवार, श्रीम. सुमन रोकडे यांच्या कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular