Friday, May 10, 2024
spot_img
36.1 C
Delhi
Friday, May 10, 2024
HomeBlogपाईप लाईन लिकेंज मुळे, बंद करण्यांत आलेला व्हिटी लाईन पाणीपुरवठा सुरू.

पाईप लाईन लिकेंज मुळे, बंद करण्यांत आलेला व्हिटी लाईन पाणीपुरवठा सुरू.

सफाळे : ४ एप्रिल २०२४ रोजी सफाळे पुर्व बाजार पेठेतील वालजी काका यांच्या दुकाना समोर असलेल्या मोरी जवळील व्हि टी लाईन ( सफाळे पश्चिम ) भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या मेन पाईप लाईनला अज्ञात चारचाकी वाहनाने अचानक धडकेनंतर, पाणीपुरवठा करण्याऱ्या पाईप लाईन मधून जोरदार पाण्याचा प्रवाह सुरू होऊन, रस्त्यावर पाणी वाहू लागले. त्याठिकाणी असलेल्या प्रत्यक्ष दर्शनी लोकांनी पाईप लाईन मधून वाहणारे पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने, स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या सहकार्याने व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा खंडात करण्यात आला.
लिकेंज पाईप लाईन दुरूस्तीसाठी, लागणारे साहित्य कर्मचारी, जे सी बी उपलब्ध होताच. दिनांक ५ एप्रिल रोजी सफाळे ग्रामपंचायत आजी- माजी पदाधिकारी, पाणीपुरवठा विभाग पदाधिकारी कर्मचारी यांनी, ज्या ठिकाणी पाणीपुरवठा करणारा पाईप – लिकेंज होता, तो भाग कटरने कापुन व जे सी बी च्या सहाय्याने वेगळा करून, त्याठिकाणी नवीन पाईप जोडुन, पाणी गळती बंद करून, व्हि टी लाईन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यशस्वी झाले.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने, सफाळे ग्रामपंचायत पाणीपुरवठा अधिकारी आणि सफाळे पाणीपुरवठा कर्मचारी समिर म्हात्रे आणि सहकारी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्याने आणि सकाळच्या वेळी बाजार पेठेत असलेल्या रहदारीचे योग्य नियोजन करणारे समाजसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केलेल्या नियोजन मुळे, रहदारीस कोणताही अडथळा येऊ न देता, पाणीपुरवठा सुरळीत केला. याबद्दल सर्वसामान्य लोकांकडून पाईप लाईन दुरुस्ती करणारे, रहदारी नियंत्रण करणे यांचे कौतुक करण्यात येत आहे.
१७ गाव पाणी योजना प्रारंभ सन २००९ मध्ये करण्यात आला असून, समिती मध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य, अन्य पदाधिकारी पंचायत समिती सदस्य समाविष्ट आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular