Monday, May 20, 2024
spot_img
31.1 C
Delhi
Monday, May 20, 2024
HomeBlogअदाणीच्या डहाणूऔष्णिक ऊर्जा केंद्राला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

अदाणीच्या डहाणूऔष्णिक ऊर्जा केंद्राला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

अदाणीच्या डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

डहाणू, ८ मे २०२४ : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे तांत्रिक- पुस्तकी ज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष कामात होणारा वापर, यातील तफावत भरून काढण्याचा अदाणी इलेक्ट्रिसिटी चा नेहमीच प्रयत्न असतो. त्यासाठी कंपनीने सन २००६ पासून महाराष्ट्र, गुजरात आणि दमण मधील सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांना अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राची भेट घडवून आणली आहे. हे केंद्र पाचशे मेगावॉट ऊर्जानिर्मिती क्षमतेचे आहे.


या वर्षातच आतापर्यंत महाराष्ट्रातील ८४ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी अदाणी डहाणू ऊर्जानिर्मिती केंद्राला भेट देऊन अमूल्य असा प्रत्यक्ष अनुभव मिळवला आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि सिव्हील इंजीनियरिंग अशा वेगवेगळ्या अभियांत्रिकी विभागातील आहेत. अदाणी डहाणू ऊर्जानिर्मिती केंद्र हे त्याच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल ओळखले जात असून त्यासाठी केंद्राला आतापर्यंत देशात अनेक सर्वोत्कृष्टतेचे पुरस्कार मिळाले आहेत.


प्रकल्प भेटीमुळे मिळाले सखोल शिक्षण


औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्रातील ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया कशी होते, याची संपूर्ण प्रक्रिया आणि सखोल ज्ञान अशा भेटींमधून विद्यार्थ्यांना नेहमीच मिळते. ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा घेण्यापासून ते केंद्रात तयार झालेली वीज ग्राहकांना कशी पुरवली जाते, या सर्व टप्प्यांबाबत, प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.



तसेच ऊर्जानिर्मिती केंद्राचे कामकाज नेमके कसे चालते, हे दाखवणारी २४० स्थिर मॉडेल आणि २८ हलती मॉडेल यांचेही निरीक्षण अशा भेटींमध्ये विद्यार्थ्यांना करता येते. विशेष म्हणजे टाकाऊमधून टिकाऊ या तत्त्वाचा अवलंब करून अदाणी डहाणू ऊर्जानिर्मिती केंद्राने ही सर्व मॉडेल निर्माण आणि विकसित केली असून त्यांची देखभालही व्यवस्थित केली जाते.



भावी इंजिनियर चे प्रशिक्षण


अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या प्रवक्त्याने या भेटीसंदर्भात सांगितले की, “भावी इंजिनियरना प्रशिक्षण देण्यावर आमचा नेहमीच भर असतो. विद्यार्थ्यांना वर्गात मिळणाऱ्या पुस्तकी आणि तांत्रिक ज्ञानाला पूरक-सहाय्यभूत म्हणून अशा भेटींमध्ये दिसणाऱ्या प्रत्यक्ष कामकाजाचा पुष्कळ उपयोग होतो. औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राला अशा भेटी देऊन त्याचे कामकाज पाहिल्याने ऊर्जानिर्मिती आणि त्यातील तांत्रिक गुंतागुंत याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना होते. अशा औद्योगिक भेटींद्वारे देशाला ज्ञानी आणि पात्र असे इंजिनिअर पुरवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

अदाणी  इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड बद्दल

अदाणी  इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड हा वैविध्यपूर्ण अदाणी  समूहाचा भाग आहे. कंपनी वीज निर्मिती, पारेषण आणि किरकोळ वीज वितरणाचा एकात्मिक व्यवसाय आहे. एईएमएलची भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात कार्यक्षम वीज वितरण जाळ्यांवर मालकी आहे. एईएमएल ४०० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या ३ दशलक्ष ग्राहकांना सेवा देते. मुंबई आणि उपनगरात ९९.९९ टक्के विश्वासार्हतेसह २००० मेगावॉटच्या जवळपास वीज मागणी पूर्ण केली जाते, जी देशातील सर्वाधिक आहे. एईएमएल प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular