Thursday, May 2, 2024
spot_img
29 C
Delhi
Thursday, May 2, 2024
HomeBlogमहा. राज्य जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी ( रजि.) संघटना नवनिर्वाचित कार्यकारणी...

महा. राज्य जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी ( रजि.) संघटना नवनिर्वाचित कार्यकारणी नियुक्ती संपन्न

महा. राज्य जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी ( रजि.) संघटना नवनिर्वाचित कार्यकारणी नियुक्ती संपन्न.
८ एप्रिल
पालघर ( एच. लोखंडे ) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य (नोंदणी क्रमांक २५७ / ८९ ) ची सर्वसाधारण निवडणूक दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी, श्री क्षेत्र गजानन महाराज शेंगाव जि. बुलढाणा, येथे पार पडली त्यामध्ये नवनिर्वाचित कार्यकारीनीमध्ये राज्याध्यक्ष पदावर पुनश्च श्री शिवराज जाधव साहेब (सोलापूर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदावर श्री ज्ञानेश्वर आढाव (पुणे) यांची नियुक्ती होऊन, मुख्य सचिव पदावर श्री बालाजी एम.सातपुते यांची बहुमताने निवड करण्यात आली. श्री किरण खेसमाळकर – सचिव, श्री किरण यशवंतराव – सहसचिव पदासाठी यांची बहुमताने निवड झाली आहे
महाराष्ट्रा राज्यातील एकूण ३० जिल्ह्यातील, जिल्हा अध्यक्ष / सचिव व कार्यकारिणी सदस्य असे एकूण ४५० सभासदांनी आपला सहभाग नोंदविला असून संविधानिक पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून श्री शिवाजीराव गवई साहेब, श्रीम. सुनंदा ताई निकम , श्री मानके साहेब यांनी पीठासीन अधिकारी म्हणून उत्तम प्रकारे कामकाज पार पाडले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना ( रजि ) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नवीन केंद्रीय कार्यकारीनीस पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छांचा संदेशांचा वर्षाव, पालघर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्ते व सदस्य यांच्या कडून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular