Thursday, May 2, 2024
spot_img
32.8 C
Delhi
Thursday, May 2, 2024
HomeBlogमासिक निवृत्तीवेतन ई-कुबेर  प्रणालीव्दारे होणार जमा

मासिक निवृत्तीवेतन ई-कुबेर  प्रणालीव्दारे होणार जमा

मासिक निवृत्तीवेतन ई-कुबेर  प्रणालीव्दारे होणार जमा

पालघर दि. ०८ :  निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांचे निवृत्तीवेतन व इतर लाभ हे कोषागारामार्फत रिझर्व बँकेतून थेट त्यांच्या खात्यात जमा करणे करिता’ ई-कुबेर प्रणाली ‘विकसित करण्यात आलेली असुन त्याव्दारे यापुढे निवृत्तीवेतन व निवृत्तिवेतनविषयक लाभ मिळणार आहेत.

सद्यस्थितीत पालघर कोषागार कार्यालय अधिनस्त निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना सी.एम. पी. प्रणालीद्वारे निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येत असून यापुढील कामकाज ई-कुबेर प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे . ई-कुबेर या प्रणालीची अंमलबजावणी करतेवेळी असे निदर्शनास आले आहे की, निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी निवृत्तीवेतन सुरु करतेवेळी पालघर जिल्हयातील अधिकृत बँकेत खाते उघडले व नंतर सदर

बँक खाते कोषागार कार्यालयाच्या अपरोक्ष इतर जिल्हयातील इतर बँकेत / शाखेत वर्ग करुन घेतलेले आहेत. संबंधीत

खाते इतर बँकेत वर्ग केल्यामुळे बँक आय एफ.एस.सी. कोड मध्ये बदल झालेला आहे. ई-कुबेर प्रणालीत बँक शाखा आय. एफ. एस. सी. कोड तसेच संबंधितांची नावे अचुक असणे बंधनकारक असल्यामुळे जिल्हा कोषागार अधिकारी,

पालघर यांनी आवाहन केले आहे की, निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी जिल्हयाबाहेर खाते वर्ग केले

असल्यास ते खाते पालघर जिल्हयातील मुळ शाखेत वर्ग करावे व जिल्ह्यांतर्गत शाखा बदल केला असल्यास पुर्वीच्या

बँकचे ना-देय प्रमाणपत्रासह नवीन बँक शाखेचे पासबूक प्रथम पृष्ठ छायांकित प्रत पालघर कोषागार कार्यालयास सादर

करावी जेणेकरुन नियमित मासिक निवृत्तीवेतन मिळण्यास समस्या निर्माण होणार नाहीत. असे न केल्यास व

निवृत्तीवेतन जमा होण्यास समस्या निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांची राहील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular