Monday, May 20, 2024
spot_img
36.1 C
Delhi
Monday, May 20, 2024
HomeBlogसंपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे प्रभू श्री धनकुबेर यांचे मंदिर ; धन दैवतांची पूजा...

संपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे प्रभू श्री धनकुबेर यांचे मंदिर ; धन दैवतांची पूजा करण्याचे आवाहन

पालघर / मुंबई. (प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे प्रभू श्री धनकुबेर यांचे मंदिर श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात निर्माण करण्यात आले असून भाविकांसाठी दर्शनसाठी खुले करण्यात आले आहे असे मंदिराचे अध्यक्ष विनोद सिंह यांनी सांगितले आहे.

यावेळी सिंह म्हणाले की, फक्त दिवाळी सणातील धनत्रयोदशी किंवा धनतेरस च्या दिवशी आपण धनलक्ष्मी ची पूजा करत असतो. आणि वर्षभर अधूनमधून आपल्या काही आर्थिक अडचणी जाणवली तर आपण धनलक्ष्मीची पूजा करत असतो. तसेच, आपण सर्वजण वर्षभर काबाडकष्ट करत असतो तरी देखील आपल्याकडे हवी अशी धनप्राप्ती होत नाही. धनप्राप्ती व्हावी म्हणून आपण धनलक्ष्मीची पूजा दररोज सकाळी करत असतो. परंतु एका बाजूला आपण धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण, धनकुबेर यांना देखील प्रसन्न करण्याचे तितकेच महत्त्वाचे असून त्यांची आवश्यकता आहे. याची माहिती आम्हाला काही वेद, पुराण आदी ग्रंथांमधून आमचे मित्र एस. मुलाणी यांच्या वाचनातून मिळाल्यानंतर आम्ही धनकुबेर यांचे मंदिर स्थापन करण्याचा मानस केला. त्यानंतरच आम्ही भगवान श्री धन कुबेर यांचे मंदिर बनवून त्यांची प्राणप्रिष्ठा नुकतीच केली आहे. आम्ही तमाम जनतेला आव्हान करू इच्छितो की, प्रभु श्री धनकुबेर यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडाखडकोना मनोर जवळ श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात येऊन आपण प्रभू श्री धनकुबेर यांची पूजा करून आपली मागणी प्रभू श्री धनकुबेर यांच्याकडे करावी जेणेकरून आपणास आशीर्वाद लाभेल असे आश्रमचे अध्यक्ष विनोद सिंह म्हणाले. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रभू श्री धनकुबेर यांचे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सुरेश नागेश्वर उर्फ नागसाधू देव इंद्र महाराज यांनी बनविले आहे. अशी माहिती सिंह यांनी दिली.

याप्रसंगी श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंह, पारसनाथ देवनारायण सिंह, संतोष रुद्यनारायण सिंह, दैनिक परशुराम समाचार दिलीप सिंह, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी, हेमांशु संजय सिंह, अभिषेक संजय सिंह, सुमित विनोद सिंह, आशिष माताप्रसाद सिंह, स्नेहा सिंह, यांच्या सह मंदिरातील पुजारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular